राहुलकुमार अवचट
यवत : श्री क्षेत्र शिर्डी निवासी सद्गुरु साईनाथांच्या पादुका दर्शन सोहळा व साई भंडारा याचे आयोजन दौंड तालुक्यातील खामगाव ( तांबेवाडी ) येथील श्री लाटोबा मंदिर येथे करण्यात आले होते.
श्री साईबाबा पालखी सोहळा समिती, पुणे पालखी सोहळ्यात येथील फक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. गावातील नागरिकांनाही श्री साई पादुकांचे दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी दरवर्षी मार्गशीर्ष कृ पंचमी निमित्त साई भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
“जो जो मज भजे जैसा जैसा भावे! तैसा तैसा पावे मी ही त्यासी !!”
पहिल्या दिवशी श्री साई पादुकांची मिरवणूक काढण्यात आली तर दुसऱ्या दिवशी पहाटे कांकड आरती, अभिषेक, श्री साईसच्चरित पारायण, श्री साईसत्यनारायण महापुजा, माध्यांन्ह आरती, महाप्रसाद व श्री संत सावतामाळी भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
रात्री धुपारती नंतर रामायणाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे सुश्राव्य किर्तन होऊन शेजारती करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन श्री साई सेवा मंडळ , तांबेवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.