पुणे : पुण्यातील धनकवडी येथील श्री सद्गुरू संतवर्य योगिराज शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या नुकत्याच झालेल्या सभेत २०२५ या वर्षाकरिता डॉ. मिहिर कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर सतीश कोकाटे यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळात पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, सुरेंद्र वाईकर, राजाभाऊ सूर्यवंशी, नीलेश मालपाणी आणि प्रताप भोसले यांचा समावेश आहे.
या वेळी डॉ. मिहिर कुलकर्णी म्हणाले कि, यावर्षी ट्रस्टचा तळजाईजवळील भक्तनिवास आणि समाधी मठाच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार करून सामाजिक उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा संकल्प आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा ७९ वा समाधी सोहळा २८ एप्रिल २०२५ ते ५ मे २०२५ या काळात साजरा होणार आहे. समाधी सोहळ्यानिमित्त संगीत महोत्सव, भजन, प्रवचन, कीर्तन, लघुरुद्र, पालखी सोहळा यासह ध्यान शिबिर, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरही होणार आहे.