Viral Video : अनेक व्यक्ती प्रवासा दरम्यानचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. प्रवासादरम्यान शूट केलेल्या व्हिडिओत अनेक व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागतो तर अनेकदा धोकादायक घटनाही घडत असतात. सध्या असाच काहीसा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणाने धावत्या ट्रेनच्या इंजिनवर झोपून प्रवास केलेला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण आहे. जो चक्क धावत्या ट्रेनच्या इंनिजनवर झोपलेला दिसत आहे. झोपून तो रील्स व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत आहे. कोणत्याही सुरक्षितेच्या साधनांचा वापर न करता तो इंजिनवर झोपलेला दिसत आहे. तरुणाचा जराही तोल गेला असता तर तो सरळ धावत्या ट्रेनमधून खाली पडला असता.
यह इंसान रेलगाड़ी के इंजन के ऊपर चढ़कर वीडियो बना रहा है, इसको अपने जान की कोई परवाह नहीं है !!
इसको देखकर बच्चे भी ऐसा करने को सोचेंगे, जो बहुत भयावह है !!
लेकिन यह इंसान यहां तक पहुँचा कैसे? रेलवे पुलिस क्या कर रही थी? इसको ऊपर चढ़ने कैसे दिया?#ViralVideo #Trendingvideo… pic.twitter.com/6MgRIu74ai
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) January 3, 2025
तरुणाचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@ManojSh28986262” या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,”रेल्वेच्या इंजिनवर चढून व्हिडिओ बनवतोय हा व्यक्ती, त्याला जीवाची पर्वा नाही!!”,असे कॅप्शन देण्यात आलेले आहे. व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.