कोल्हापूर: कोल्हापूरमधून एक धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानेच विष मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे सर्वत्र एकंच खळबळ उडाली आहे. मामाने आचाऱ्याच्या समोरच हे कृत्य केले असता आचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. आचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मेहश पाटील असे याआरोपीचे नाव असून याप्रकरणी पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मामा महेश सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातुन ही घटना समोर आली आहे. महेश ज्योतिराम पाटील यांची भाच्ची आठवड्याभरापूर्वी त्याच गावातील एका मुलासोबत पळून गेली होती. पळून गेल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं. आपल्या भाच्चीने आपल्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, तसेच ती पळून गेल्याने बदनामी झाली, याचा राग तिचा मामा महेश याच्या डोक्यात होता.
पळून गेलेल्या तरूणी आणि तरूणाच्या लग्नानंतर अखेर कुटुंबियांनी त्यांना स्वीकारलं आहे. त्यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र मुलीचा मामा महेश यांच्या डोक्यात राग कायम होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने हे भयानक पाऊल उचलल्याचं समोर आलं आह . रिसेप्शनला येणाऱ्या लोकांसाठी जेवण बनवण्यात येत होतं, तेंव्हा आरोपी महेश तिथे पोहोचला आणि त्याने त्या जेवणाच्या भांड्यामध्ये विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केल.
मात्र जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याने हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्याने जेवणात विषारी औषध टाकणाऱ्या मुलीच्या मामाला रोखलं, त्या दोघांमध्येझटापटही झाली. अखेर त्या आचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ते अन्न कोणी खाल्लं नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी आरोपी महेश पाटील विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.