Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! विहिरीत पडून माय-लेकीचा दुर्दैवी अंत; वांगी नं. १ गावावर शोककळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 August 2026, 16:57

पुणे : करमाळा तालुक्यातील वांगी 1 परिसरातील जाधव वस्ती येथे विहिरीत बुडून आई आणि तिच्या 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास समोर आली.

नेमकी घटना काय घडली?

लोकविकास डेअरीच्या रस्त्यावरील जाधव वस्तीवर राहणाऱ्या शिल्पा सागर जाधव (वय 28) आणि त्यांची मुलगी ऋता सागर जाधव (वय 2) या दोघी शुक्रवारी घरीच होत्या. शिल्पा यांचे पती सागर जाधव हे सकाळी औषध आणण्यासाठी टेंभुर्णीला गेले होते, तर त्यांची सासू शेतातील कामासाठी बाहेर पडली होती. शिल्पा यांचे सासरे आजारपणामुळे घरातच होते.

दुपारी कुटुंबीय जेवणासाठी घरी परतले असता, आई-मुलगी घरात कुठेही दिसल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने आसपास शोध सुरू केला. घरासमोरील विहिरीत चिमुकल्या ऋताची चप्पल तरंगताना दिसल्याने सर्वांच्या पायाखालील जमीन सरकली. गावकऱ्यांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली. विहिरीत पाणी जास्त असल्याने 3 मोटर पंपांच्या साहाय्याने पाणी उपसण्यात आले. स्थानिक तरुणांनी पाण्यात उतरून शोध घेतला असता, आधी 2 वर्षांच्या ऋताचा आणि त्यानंतर थोड्या वेळाने शिल्पा यांचा मृतदेह हाती लागला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, लहानगी ऋता खेळता खेळता विहिरीजवळ गेली आणि अचानक आत पडली. तिला वाचवण्यासाठी आई शिल्पा यांनी कसलाही विचार न करता थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, शिल्पा यांना पोहणे येत नसल्यामुळे त्याही पाण्यात बुडाल्या आणि माय-लेकीचा अंत झाला.

घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वांगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाजपने जाहीर केली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी! महाराष्ट्राचा ‘दबदबा’ कायम; संघटनेत मोठे फेरबदल….

Monday, 17 August 2026, 16:34

श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Monday, 17 August 2026, 16:07

सिंहगडावर तरुणीला केला किळसवाणा स्पर्श! गर्दीचा फायदा घेत हात लावला अन् दोन गटांत तुफान राडा; पहा व्हायरल VIDEO

Monday, 17 August 2026, 16:03

पुण्यातील रीलस्टार राड्याचं थेट सातारा कनेक्शन! ‘याला जिवंत सोडू नका’ म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; प्रसिद्ध रीलस्टारला अटक

Monday, 17 August 2026, 15:26

पुण्यात पुतण्याचं काकुसोबत राक्षसी कृत्य! नकार देताच डोकं सटकलं अन् रागाच्या भरात चाकूने सपासप वार

Monday, 17 August 2026, 15:04

अंगणवाडीत शिकतोय, पण स्वप्न मात्र आमदार होण्याचं! शिरूरच्या चिमुकल्या शौर्यच्या निरागस वक्तव्याने जिंकली उपस्थितांची मनं

Monday, 17 August 2026, 14:31
Next Post

फेसबुकवरील अश्लील कमेंटप्रकरणी लाखेवाडीतील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.