जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय लष्कारचं वाहन दरीत कोसळलं आहे. यामध्ये 4 जवान शहीद झाले आहेत. तर 2 जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एसके पायीन भागात हा अपघात घडून आला आहे. लष्कराचा ट्रक घसरून दरीत कोसळला त्यामुळे हा भीषण आपघात झाला आहे. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. यामध्ये स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान सहभागी आहेत.
उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळ्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून अपघाताचं कारण शोधलं जात आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत 9 जवानांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
या अगोदर,जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ते अपघात झाला होता..
दरम्यान, याआधीही 24 डिसेंबर 2024 रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात लष्कराचे वाहन 300 फूट खोल दरीत कोसळले होते. पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात घडून आला होता. या अपघातात 5 जवान शहीद झाले होते. त्यानंतर हा अपघात घडला आहे. यामध्ये 2 जवान शहीद झाले आहेत.
चार दिवसांपूर्वी, पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागातही अपघात..
चार दिवसांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 2024 रोजी पूंछ जिल्ह्यातील मेंढारमधील एलओसीजवळील बलनोई भागात लष्कराच्या वाहनाला संध्याकाळी सहा वाजता अपघात घडून आला होता. जेव्हा अनेक जवानांना घेऊन लष्कराचे वाहन ऑपरेशनल ड्युटीवर जात होते, त्यावेळी वाटेत हा अपघात झाला होता. लष्कराचे वाहन सुमारे 100 फूट खोल खड्ड्यात पडले होते. या अपघातातही 5 जवानांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.