नाशिक : नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्याच दिवशी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमात होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराला मिठी मारल्याच्या कारणातून या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांने आपलं आयुष्य संपवल असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरेकृष्ण पांडे असं या तरुण आयकर अधिकाऱ्याचं नाव आहे. हरेकृष्ण यांचं आयुष्य सुरळीत सुरु होते. शिक्षण, त्यानंतर नोकरी असे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार पडल्यानंतर हरेकृष्ण लग्नाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले.जिच्यासोबत संसाराची स्वप्ने बघितल, तिच्यामुळे पांडे यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.काही दिवसांपूर्वीच हरेकृष्ण पांडे यांचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याच्या दिवशी होणाऱ्या बायकोने आपल्या प्रियकराला मिठी मारल्याने वादाला सुरुवात झाली.
हा सर्व प्रकार पाहून हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात गेले. त्यानंतर होणाऱ्या पत्नीने पांडे यांना विविध प्रकारे धमकी, ब्लॅकमेलिंग करणे सुरू केले. या सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून पांडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
आयकर अधिकारी पांडे यांनी लग्नाच्या दिवशीच उत्तमनगरमधील आयकर कॉलनी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत