वाडा (पालघर) : पालघर बातमी समोर आली आहे. प्रसूती कडा जाणवत असल्याने कुटुंबीय गरोदर महिलेला प्रसूतीसाठी वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र येथील डॉक्टर व नर्सकडून सदर महिलेला ठाणे जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. यानंतर महिलेला नेत असताना वाडा-भिवंडी महामार्गावर रात्री महिलेची प्रस्तूती झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आब्जा गावातील गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याने तिच्या पतीने तिला रात्री वाडा ग्रामीण रूग्णालयात आणले. मात्र वाडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांनी या महीलेला रूग्णालयात दाखल करण्यासाठी मनाई करण्यात आली. इतकेच नाही तर ठाणे येथील सिव्हील रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. महिलेला त्रास अधिक होत असल्याने पतीने लागलीच तिला ठाणे नेण्याचा निर्णय घेतला.
रस्त्यावरच झाली प्रसूती..
सदर गरोदर महिलेचा पती कैलास भोयू याने १०८ रूग्णवाहीका बोलावून ठाणे जायला येथे निघाले. मात्र रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास या महीलेची प्रस्तूती रस्त्यातच झाली. सदर महीलेला दोन तास या रस्त्यावरच खूप वेदना सहन कराव्या लागल्या. प्रसूती झाल्यामुळे तिला ठाणे न नेता पुन्हा वाडा रूग्णालयात पुढील उपचारासाठी आणले.
पुढील उपचारासाठीही नकार..
प्रसूती झाल्यानंतर सदर महिलेला वाडा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी परत आणले असता येथे दाखल करून घेण्यासही डॉक्टर व नर्स यांच्याकडून नकार देण्यात आला. हात जोडून विनंती केल्यावर यांनी महीलेला रूग्णालयात दाखल करून घेतल्याचा सर्व प्रकार केवळ वाडा रूग्णालयातील डॉक्टर व नर्समुळे झाला आहे. यामुळे या रूग्णालयातील डॉक्टर व नर्स यांची चौकशी होणे गरजेचे आहे. असे सांगण्यात येत आहे.