पिंपरी : सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगरमध्ये घडली घडली असून या घटनेने एकच क्जलबल उडाली आहे. राजू नारायण राजभर (वय ४५, रा. साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर (वय १९) यांनी शुक्रवारी (दि. ३) निगूडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे (रा. घरकुल सोसायटी, चिखली), महादेव फुले (रा. आनंद नगर चिंचवड स्टेशन), राजीवकुमार ऊर्फ गुड्डू भैया (रा. पिंपळे सौदागर) आणि महिला आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे वडील राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुन देखील त्याचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसुन तुला मारु, तुला कापुन टाकू, अशा वारंवार धमक्या देण्यात आल्या.
आरोपींकडून देण्यात येणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे ते सतत तणावात होते. हा तणाव असहाय्य झाल्याने त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.