मुंबई: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार, हा मोठा प्रश्न होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का मैदानात उतरवला आहे.
यामध्ये डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतू एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी दिली आहे.