अमोल दरेकर
सणसवाडी, (पुणे) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सविंदने परिसराला आज सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने झोडपलं. या गारपिटीच्या पावसाने शेतीमालाचं प्रचंड नुकसान झाले.
कांदा, मिरची, गहू यांसह इतर तरकारी मालांना या गारपिटीचा मोठा फटका बसला असून, सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गारामुळे शेतीमालचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे शेत मालावर रोगाचे संकट घोंगावत असताना शेतमालावर विविध प्रकारच्या फवारणीचा खर्च त्यात गाराचा सडा यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.