अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे : शिरूर एसटी स्थानकाच्या इमारत कामाच्या दर्जा बाबत शंका निर्माण करणारी घटना घडली आहे. इमरातीच्या छताच्या कॉलमचा प्लास्टरचा काही भाग एका प्रवासी महिलेच्या डोक्यात पडला आहे. त्यामध्ये महिला किरकोळ जखमी झाली आहे.
संगीता इंगळे व त्यांचे पती सखाराम इंगळे हे मंगळवारी (ता.२०) रोजी गावी जालन्याला जाण्यासाठी निघाले होते. शिरूर बस स्थानकात कंट्रोल रूमच्या समोर बसची वाट पाहत बसले होते. (Shirur News ) यावेळी बस स्थानकाच्या छताच्या कॉलमचा प्लास्टरचा काही भाग संगीता इंगळे यांच्या डोक्यावर पडला. यामुळे त्यांच्या डोक्याला जखम होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, संगीता इंगळे यांचे पती सखाराम इंगळे यांनी त्यांना तत्काळ येथील दवाखान्यात नेवून वैद्यकीय उपचार केले आहेत. या घटनेबाबत त्यांनी शिरूरचे आगार व्यवस्थापक यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याचे सखाराम इंगळे यांनी सांगितले.
बसस्थानकाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे काम बीओटी तत्त्वावर नुकतेच झाले आहे. तर काही काम सुरू आहे. सदर इमारत नविनच असताना सुद्धा प्लास्टर निखळून पडून प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागला आहे. हि खूप दुर्दैवी घटना आहे. बस स्थानकात रोज हजारो प्रवासी येत असतात. (Shirur News ) आजच्या घटनेवरून अनेकांनी कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण केल्या असून बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिरूर नगरपरिषदेने दिलेले शिरूर बसस्थानका संदर्भातील भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे. नव्याने बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट होईपर्यंत बसस्थानकाचा वापर त्वरित स्थगित करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.
सदर महिलेचा लेखी तक्रार अर्ज मिळाला असून प्लास्टर पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली आहे. (Shirur News ) संबंधित महिलेला तत्काळ वैद्यकीय मदत करण्यात आली असून याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहे.
– भैरवनाथ दळवी,
(प्रभारी आगार प्रमुख-शिरूर बस स्थानक)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करा; सकल मातंग समाजाची मागणी
Shirur News : बाप्पांची विधीवत पूजा, आरती, धूप, उदबत्तीचा सुगंध अन् आकर्षक विद्युत रोषणाई…