अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे, (पुणे) पाबळ (ता. शिरुर) येथे महापारेषण वीज कंपनीचे वीज मनोरे उभारणीचे काम सुरु आहे. येथे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा सुरु असताच १४ सप्टेंबर रोजी महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश नारायण चौधरी यांच्या शेतातील मनोऱ्यावर बळजबरीने तारा ओढण्याचे काम सुरु केले. यामुळे संतप्त झालेल्या प्रकाश चौधरी यांनी महापारेषणच्या अधिकाऱ्यांसमोर शेतामध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर चौधरी अत्यवस्थ झाल्याने, त्यांना खेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकृती गंभीर झाल्याने केले खेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल
पाबळ (ता. शिरुर) येथे महापारेषण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे घडलेल्या घटनेबाबत बोलताना येथील शेतकरी राहुल चौधरी, कल्पेश चौधरी, संजय चौधरी, पांडुरंग लोखंडे, गोरक्ष चौधरी यांनी सांगितले की, पाबळ परिसरात महापारेषण कंपनीचे विजेचे टॉवर उभारण्याचे काम सुरु आहे. (Shirur News) शेतीच्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून सातत्याने महापारेषणकडे विनंती केली असून, अधिकाऱ्यांसमवेत दोन बैठकाही झाल्या आहेत.
दरम्यान, संबंधित अधिकारी व कंपनी दमदाटी करून, मोबदला देण्यास टाळाटाळ करत आहे. सुरु असलेल्या कामाबाबत शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना दिली जात नाही. वारंवार शेतकऱ्यांवर पोलीस बळाचा वापर केला जात आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा धमक्या दिल्या जात आहेत. (Shirur News) अधिकाऱ्यांच्या या जाचाला कंटाळूनच प्रकाश चौधरी या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे या वेळी शेतकऱ्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पारोडीत वनविभाग व ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी
Shirur News : टाकळी हाजीतील चार शिक्षकांना जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार