युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : पाऊस मोठ्या प्रमाणात येणार असेल तर पक्षी झाडाच्या उंच भागात सुरक्षीत ठिकाणी घरटे बांधतात. हे जास्त पाऊस असण्याचे लक्षण आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची खबरबात पक्ष्याकडूनच मिळते. कुहू हू…कुहू हू… म्हणणारी कोकीळा, ‘पेरते व्हा,’ अशी साद घालणारा पावशा हे नेहमीच पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सज्ज ठेवत असतात. तसाच असाच एक पाहूणा उशीरा का होईना पावसाचा सांगावा घेऊन शिरूर च्या ग्रामिण भागात दाखल झाला आहे. या बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी शिरूरच्या ग्रामिण भागात चातकाचे छायचित्र टिपले आहे. (The ‘Chatak’ that brings the rain was found in Shirur Rural)
चातक शिरूर तालुक्याच्या घोडनदी किनारी दाखल
काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या डोक्यावर शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकीएवढा आकार लांबशेपुट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो. (Shirur News) हनुवटी, मान व पोटाचा पांढरा भाग असतो. पंखांवर रूंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा पक्षी सहज ओळखता येतो.
शेपटीतील पिसांची टोको पांढरी असतात, डोळे तांबडे तपकिरी , चोच काळी व पाय काळसर निळे असतात, ते एकेकटे किंवा यांची जोडी असते. चातक सध्या शिरूर तालुक्याच्या घोडनदी किनारी दाखल झाला आहे. कोकीळा, पावश्या, कारूण्य,बुलबूल, रॅाबीन या गाणाऱ्या पक्ष्यांसमवेत चातकाच्या सुरांची रानमैफल घोडनदी किनारी रंगलेली पहावयास मिळत आहे. चातकाची विण जून पासून अॅागस्टपर्यत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. (Shirur News) कोकीळेप्रमाणे याही पक्षात भ्रण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाईच्या घरट्यात घालते. सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो. काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यातअंडी घालता येतात. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणे आकाशी असतो. सप्टेंबर च्या सुमारास सातभाईचे पिले अड्यांतून बाहेर येतात. त्यातच चातकाचे पिल्लू असते. चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसरआडवा पट्टा असतो.
शिरूर च्या ग्रामिण भागात काही ठिकाणी मान्सुनपुर्व पाऊसाने हजेरी लावली. या काळातच वातावरण बदलून गेल्याने वनविभागात झाडांना देखील नवीन पालवी आल्याचे पहावयास मिळाले. या काळात पक्षांची रेलचेल वाढली. उन्हाळ्यानंतरच्या पावसाळ्याचे स्वागत पक्षी मोठ्या उत्साहात करतात. वेगवेगळ्या रंगाचे व सुरेल आवाजात निसर्गातील बदलणाऱ्या वातावरणाचा संदेश हे पक्षी देत असतात. त्यामुळे रामलिगं शिरूर परिसरात चातकाचा देखील पावसाचा संदेश देताना त्याचा सुरेल आवाज ऐकू येऊ लागला आहे.
मनोहर म्हसेकर
वनपरिक्षेत्र अधिकारी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सुट्टी संपली, शैक्षणिक वर्षाला सुरुवात, पर्यटनस्थळे रिकामी
Shirur News : कारला अचानक लागली आग; कारचालकाचा आगीत होरपळून मृत्यू
Shirur News : मृग नक्षत्रात भरपूर पाऊस; पंचागकर्त्यांचे मत, हत्ती वाहन सुरु