Shirur News : स्त्री शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. स्त्री ने मिळविलेल्या शिक्षणातून ज्ञान देऊन त्यातून गुणवत्ता निर्माण करणे ही आगळिक आहे. भविष्यातील पिढीला दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे. आनंदात मनोरंजनात शिक्षणाचे धडे देऊन समाजात मानाने जगविण्यास शिकवायचे. आयुष्यातील यशाला गवसणी घालण्यासाठी तिन दिलेले धडे यशस्विते कडे नेताना दिसतात. मलठण ( ता. शिरूर ) येथील मानसी थोरात अशाच शिक्षण क्षेत्रातील नवदुर्गा ठरत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व
भारताच्या विकासासाठी महिलांना शिक्षण हा एक महत्वाचा टप्पा आहे. 50 टक्के महिला त्यामुळेच शिक्षणाच्या प्रवाहात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी घेतलेली आघाडी महत्वाची ठरत आहे. सरकार कडून सुरू असलेल्या योजना आणि उपक्रमातून त्या प्रवाहात येणे शक्य झाले आहे. त्यांच्यातील कौशल्याचा विकास झाल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
शिरूर तालुक्यातील मलठण येथील मानसी थोरात यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून 2006 साली संधी मिळाली. नोकरी झाल्यानंतर बि. ए. व एम. ए. उच्चपदवी चे शिक्षण त्यांनी घेतले. मनमिळाऊ स्वभावामुळे व आवाजातील गोडवा यामुळे विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका म्हणून मुले आकर्षीले जातात. सुंदर कविता आणि धड्यांची वास्तविकता मुलांसमोर मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे. सकाळी परिपाठापासून त्यांच्या कामाला सुरवात होते. मुलांना कला व सांस्कृतीक विषयाची आवड निर्माण व्हावी. यासाठी नेहमी प्रयत्नशिल असतात. हसतखेळत मुलांना मनोरंजनातून शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशिल असतात.
दरम्यान, सन 2008 मध्ये लोकनृत्यासाठी शाळेला दुसरा क्रमांक पटकावला आहे. 2017-18 मध्ये भजन व लोकनृत्य स्पर्धेत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2018 मध्ये पदवीधर महिला तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन विद्यार्थी घडविण्याचे काम त्या करतात. नॅशनल टेंलटसर्च स्पर्धेत पहिलीचा विद्यार्थी राज्यात सातवा आला. गेल्या 15 वर्षाच्या कालावधीत योग साधना, चित्रकला, रांगोळी चे ज्ञान मुलांना दिले आहे. आरोग्य संपदा, हळदीकुंकू, स्वच्छता, सावित्रीच्या लेकी, पर्यावरण, वाढती लोकसंख्या यावर पथनाट्य सादर केलेली आहेत.
मुलांना संगणकीय ज्ञान मिळावे. यासाठी धडपड सुरू असते. त्यातून त्यांनी संगणकीय प्रयोगशाळा उभी केली. लोकसहभाग वाढवून गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या वेळप्रसंगी फि भरण्यातही पुढाकार घेतला आहे. शिरूर तालुक्याबरोबर खेड तालुक्यात देखील त्यांनी शिक्षणाचे पवित्र कार्य केले आहे. उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणारे विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.
महिलांचा शिक्षणातला सहभाग वाढला असला तरी त्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग आजही तेवढाच कमी आहे. मुलांप्रमाणे आजही खेड्यात मुलींच्या उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही. तिंचे लग्न, संसार याकडे सर्वाधिक कुटूंब लक्ष देते. समाजातील ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नोकरी बरोबरच उद्योग यामध्ये देखील महिलांचा सहभाग निर्माण झाला पाहिजे. भांडवल नफ्या तोट्याचे गणित जुळविण्यासाठी त्यांची मानसिकता वाढवली पाहिजे.
मानसी थोरात (शिक्षिका- जिल्हा परिषद शाळा मलठण, ता. शिरूर)