युनूस तांबोळी
(Shirur News ) शिरूर : छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या परिसराचा खरा इतिहास जनतेपुढे ही साहित्यिक मंडळी मांडत आहेत. राज्यात प्रत्येक ठिकाणी विखुरलेल्या सामान्य घटकाला न्याय मिळाला पाहिजे. हा तळागळातील माणूस नेतृत्व करु शकतो याची जाण संभाजीराजेंना होती. तसेच 18 भाषेवर प्रभुत्व करीत त्यांनी समतेचा विचार करणारे 3 ग्रंथ लिहीले. हे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत. असे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष इतिहास अभ्यास डॉ. बालाजी जाधव यांनी केले.
मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद
सासवड ( ता. पुरंदर ) येथे 12 मार्च रोजी मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या संमेलनाते ते बोलत होते. संमेलनाचे उदघाटन हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे १४ वे वंशज राजेंद्र बाजी मोहिते यांच्या झाले. या वेळी स्वागताध्यक्ष म्हणुन प्रशांत पाटणे, निमंत्रक सुनील धिवार, सचिन भोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते, संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, ”छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम तरुणांना प्रेरणा देणारा आहे. त्यांची काही तथा कथित इतिहासकारांनी निंदा केली, पण खरा इतिहास पुढे आल्याने समाजात जागृती निर्माण होत आहे. साहित्य संमेलन सुरू झाल्याने साहित्यिक संभाजी महाराज लोकांना कळायला लागलेत.
कोलते म्हणाले, ”संभाजी महाराज यांच्या जन्माने पुरंदरची भूमी पवित्र झाली आहे, पुरंदरला इतिहास आणि पराक्रमाचा मोठा वारसा लाभला आहे.”
दशरथ यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन घेण्यामागील भूमिका विशद केली, पाटणे, धिवार यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रभाकर घाटगे, शरद काकडे, छाया पाटील, बाळासाहेब यादव, जगदीश उंद्रे, ईश्वर कापरे, सुजाता शिंदे, डॉ शांतवन मिटकरी यांना संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी राजाभाऊ जगताप, दत्ता भोंगळे, विजय तुपे, दीपक पवार, संजय सोनवणे, अरविंद जगताप, सुनील लोणकर, संघटक नंदकुमार दिवसे, संदीप बनकर, राहुल यादव, रफिक शेख, महादेव बोरावके, गंगाराम जाधव, सुरेश वाळेकर, छाया नानगुडे आदी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur News : नियमीत कर्ज भरणाऱ्यांना शासनाने अनुदान द्यावे ; शेतकऱ्यांची मागणी
Shirur Crime : किरकोळ वादातून ग्राहकाला मारहाण ; मलठन परिसरातील घटना, चौघांवर गुन्हा दाखल..!\