युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथे नुकत्याच खासगी कार्यक्रमात शिरूर लोकसभेचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शाश्वत विकास कामांबाबत राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्ष कटीबद्ध आहे. असे सांगितले,
डॅा. अमोल कोल्हे म्हणाले की, या सभेत विजेचा प्रश्न निर्माण केला गेला. त्यामुळे तत्काळ विजेच्या अधिकाऱ्यांना फोन करून दुपार पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले. त्या बरोबर हा सर्व परिसर बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषीत झाला आहे.
अधिक बोलताना कोल्हे पुढे म्हणाले की, दोन पेक्षा कोणती गोष्ट केली पाहिजे हे समजून घ्या. बिबट्याचा हल्ला झाल्यावर मी तेथे तत्काळ उपलब्ध झालो पाहिजे. कारण मी जनतेचा सेवक असल्याने तेथे भेट देणे, लोकांमध्ये असणे आवश्यक असल्याने ते माझे कर्तव्य आहे. (Shirur News) हे मी समजू शकतो. त्या बरोबर महत्वाचे कर्तव्य कोणते ते देखील समजून घेतले पाहिजे.
सर्वसामान्य जनतेची बाजू मागील अधिवेशनात मांडली
वाघ हा राष्ट्रिय प्राणि आहे. तसेच बिबट हा त्याची उपजात असल्याने बिबटच्या प्रजनन क्षमतेवर मर्यादा आली पाहिजे. बिबट्याच्या समस्येवर एखादी योजना आली पाहिजे. अशी मी आग्रही भुमीका मांडताना माझ्या शेतकऱ्यांना बिबट पासून मुक्ती मिळावी.यासाठी सर्वसामान्य जनतेची बाजू मागील संसदेच्या अधिवेशनात मांडली आहे. असे करणे देखील माझे कर्तव्य आहे हे समजून घेतले पाहिजे. मधल्या काळात माझ्या बाबत काही प्रचार होत होता. (Shirur News) यासाठी माझ्या तरूण मित्राने मला सोपे गणित सांगितले.
घड्याळ कशावर चालते…या घड्याळात किती काटे असतात…त्यावर सभागृहातून उत्तर आले. घड्याळात तीन काटे असतात. कुठले कुठले…त्यावर उत्तर आल. सेंकंद, मिनिट आणि तास. तास काटा सेंकदा सारखा फिरायला लागला तर काय होईल? तास काटा थांबला तर काय होईल. सेंकद काट्याने त्याचे काम करणे सोडले तर काय होईल. सेकंद काटा साठ वेळा फिरला की मिनिट काटा पुढे सरकतो. मिनिट काटा साठ वेळा फिरला की तास काटा पुढे सरकतो.
त्यावर तरूण मित्र म्हणाला की, डॅाक्टर, तुमचे काम तास काट्याप्रमाणे आहे.(Shirur News) तास काट्याप्रमाणे योजना पुढे सरकवने हे तुमचे काम आहे. जेव्हा जिल्हा परिषद सदस्य सेंकद काट्या प्रमाणे गरगरा फिरतो.त्यावेळी राज्याचे सुत्र मिनिट काट्या प्रमाणे फिरतात. मिनिट काटा फिरला, की राज्याचे सुत्र फिरले की तास काट्याप्रमाणे तयार झालेल्या योजना पुढे सरकतात. हे विसरू नका.
यावर सभागृहात टाळ्याचा वर्षाव झाला. त्यावेळी कोल्हे म्हणाले की, देशाचे व राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाशाली हे सर्व घडत आहे. (Shirur News)त्यामुळेच शिरूर लोकसभा मतदार संघात ३० हजार कोटी रूपयांच्या योजना मंजूर आहेत. अशा अनेक योजना माजी मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यात शाश्वत विकासाची धोरणे विकास कामे करण्यासाठी सदैव प्रयत्नशिल आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जमिनीच्या वाटपावरून अल्पवयीन मुलाने थेट जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने केले वार
Shirur News : बिबट्याने हल्ला चढविल्याने दोन तरूण जखमी
Shirur News : वाढत्या उन्हात आरोग्याची काळजी घ्या; डॅाक्टरांचा नागरिकांना सल्ला