युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : केंद्रसरकारने शेतकऱ्यांसाठी केलय काय,शेतमालाच्या निर्यात बंदीची धोरणे पहा. त्यामुळे शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. गेल्या नऊ वर्षात शेतकऱ्यांची माती करण्याच पाप केंद्रसरकारने केले आहे. याचा जाब विचारायची वेळ आता आली आहे. प्रत्येक वेळी कृषी सन्मान निधी दिला जातो असे केंद्र सरकार कडून ठणकावून सांगितले जाते. जे कबूल केले होते ते दिले नाहीच.त्याचे काय झाले. याबाबत केंद्रसरकारला जाब विचारला पाहिजे. कृषी सन्मान निधीच्या माध्यमातून अन्नदात्याची दररोजची किंमत१७ रूपये ठरविली आहे. अहो, अन्नदात्याची दररोजची किंमत १७ रूपये असेल तर तुम्ही करताय काय? अच्छे दिन येणार असा आभास दाखवणाऱ्याचा फोटो घेऊन जे उद्या तुमच्या समोर येतील त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. अशी केंद्र सरकार वर शिरूर लोकसभेचे खासदार डॅा.अमोल कोल्हे यांनी टिका केली. (17 rupees per day for a food donor through the Central Government’s Krishi Samman Yojana; MP Dr. Commentary by Amol Kolhe)
नऊ वर्षात शेतकऱ्यांची माती करण्याच पाप केंद्रसरकारने केले आहे
कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील मळगंगा कृषी उद्योग समुहाचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे हे होते. यावेळी भिमाशंकर कारखान्याचे (Shirur News) उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटिल, घोडगंगेचे माजी संचालक राजेंद्र गावडे, माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगेचे संचालक सुहास थोरात, माजी पंचायत समिती सदस्य डॅा. सुभाष पोकळे, सरपंच सुनिता पोकळे, सोपानराव भाकरे, सुदाम इचके, बाळासाहेब डांगे, बिपीन थिटे, शिवाजी कांदळकर, शशीकला फुलसुंदर आदी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या कांद्याला ६० रूपये भाव दिला. त्यामुळे शेतकऱ्याचा शाश्वत विकास झाल्याचे मागिल काळात पाहिले आहे. नुसती टिका करून चालणार नाही अगोधर करायचे नंतर सांगायचे (Shirur News) असे आमचे धोरण आहे. शेतकऱ्याचा विकास करून त्यांना स्वाभीमानाने उभे करण्याचे काम जेष्ट नेते पवार यांनी केले आहे. कोट्यावधीची कामे केली म्हणून जे केल ते सांगतोय. कोट्यावधीच्या कामांच्या गप्पा मारून अमेरिकेत कंपनी उघडणार नसल्याची टिका ही त्यावेळी यावेळी केली.
जी विकास कामे केली ती या सर्व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आहेत. राष्ट्रिय महामार्गाच्या माध्यमातून ३० हजार कोटी रूपयांची कामे मंजूर आहेत. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी बारामती येथे कामाची यादी वाचून दाखवली. बैलगाडा शर्यतीसाठी संसदेत प्रश्न उपस्थीत करून अखेर बैलगाडा शर्यत सुरू केली. तेव्हाच घाटात पहिल्यांदा घोडीवर बसलो हे तुम्हाला माहित आहे. (Shirur News) शाश्वत कृषी विकासाची कामे करत असताना. आधुनिक तंत्रज्ञानात कृषी धोरणे राबवून शेतकऱ्यांचा आर्थीक स्थर उंचावला गेला पाहिजे. राजकारणाच्या वेळी राजकारण करायचे, पण इतरवेळी तुमच आणि आमच जिवाभावाच नात आहे. तुमचा प्रश्न, समस्या सोडविण्याचे काम झाले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गावडे म्हणाले की, शेतकरी उभा करायचा असेल तर त्याला कृषी साहित्यांची आवश्यकता असते.कृषी साधने उपलब्ध झाल्याने परिसराचा कायापालट झाला असून शेतकऱ्यांचा आर्थीक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी (Shirur News) संसदेत समस्याविषयी योग्य बाजू खासदार कोल्हे मांडत असल्याने त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापुढेही ते कर्तुत्वसंपन्न खासदार म्हणून जनतेची सेवा करणार असल्याचे गावडे यांनी सांगितले.
प्रश्न विजेचा की…
पंचायत समितीचे माजी सदस्य डॅा. सुभाष पोकळे यांनी विजेचा प्रश्न मांडला त्यावेळी ते म्हणाले की, गेल्या पंधरा दिवस झाले या ठिकाणी विज नाही. पाणी असून विज नसल्याने पाणि उचलता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या पिकांची समस्या उभी राहिली आहे. (Shirur News) महावितरणचे शेतकऱ्यांना आठ तास विज मिळण्याचे धोरण आहे. पंरतू गेल्या पंधरा दिवस झाले दोन तास देखील विज मिळत नसल्याने शेती उत्पादनासाठी लागणाऱ्या विजेची समस्या महत्वाची आहे. सक्षम खासदार म्हणून ती तुम्ही सोडवावी.असे ते म्हणाले.
विजेच्या प्रश्नाला उत्तर देताना कोल्हे म्हणाले की, तातडीने संबधीत विज अधिकाऱ्याला फोन केला असून लवकरच दुपार पर्यंत याबाबत खुलासा मिळवून विजेचा प्रश्न मार्गी लावला जाईल.
त्यावेळी प्रदिप वळसे पाटिल म्हणाले की, (Shirur News) विजेचा प्रश्न उभा करण्याअगोदर माजी मंत्री वळसे पाटील यांनी विजचे सबस्टेशन कवठे येमाई येथे तयार केले. याचा उल्लेख होणे आवश्यक होते. सध्या आम्ही विरोधी पक्षात असल्याने विजेचा प्रश्नाचा चांगला मुद्दा तुम्ही दिला असून पोकळे तुम्ही सध्याच्या सरकारला विजेच्या प्रश्ना संदर्भात जाब विचारला पाहिजे. आम्ही तर विजे संदर्भात समस्या सोडविणारच आहोत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जमिनीच्या वाटपावरून अल्पवयीन मुलाने थेट जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने केले वार