Thursday, August 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मॉडिफाइड सायलेन्सर विरोधात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई, 22 दुचाकीस्वारांकडून 22 हजारांचा दंड वसूल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 August 2026, 22:08

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : मॉडिफाइड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश तसेच फटाक्यासारखा मोठा आवाज करणाऱ्या बुलेटसह इतर दुचाकी वाहनांवर शिक्रापूर पोलिसांनी धडक कारवाई केली असून मागील दोन महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 22 वाहनांवर कायदेशीर कारवाई करून 22 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

संबंधित वाहने 15 दिवसांसाठी पोलिसांनी ताब्यात ठेवली असून,शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव भीमा, सणसवाडी, तळेगाव शिक्रापूर, कोंढापुरी, करंदी तसेच परिसरातून मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाबाबत नागरिक, विद्यार्थी, युवती, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या.या तक्रारींची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेत मॉडिफाइड सायलेन्सर, कर्णकर्कश आवाज करणारी उपकरणे तसेच फटाक्यासारखा मोठा आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याबरोबरच संबंधित वाहने 15 दिवसांसाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.मॉडिफाइड सायलेन्सरमुळे होणारा मोठा आवाज नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून, त्यामुळे ध्वनीप्रदूषणासह वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.यापुढेही शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉडिफाइड सायलेन्सर बसविणे, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी चालविणे किंवा फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.

 

नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरच्या वाहनांवर यापुढेही वेळ, ठिकाण किंवा व्यक्तीचा कोणताही मुलाहिजा न ठेवता कायदेशीर कारवाई करण्यात येईल. परिसरातील नागरिकांना शांततामय व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले आहे.अशा प्रकारची वाहने आढळल्यास नागरिकांनी ७०७४१००११२ या क्रमांकावर शिक्रापूर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कारवाईत सहभागी पथक

सहायक पोलीस निरीक्षक भोसले, सहायक पोलीस निरीक्षक गिरी, सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कुंजीर कचरे, सहायक पोलीस निरीक्षक विकास बांगर, पोलीस हवालदार दामोदर होळकर, पोलीस हवालदार संदीप इथापे, पोलीस शिपाई लहानु बांगर, नवनाथ केंद्रे व शरद धुरपते यांनी ही कारवाई केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नारळी पौर्णिमेला 6 राशींचं नशीब चमकणार! शुभ योगांचा महासंयोग; आज कोणावर बरसणार लक्ष्मीची कृपा?

Thursday, 27 August 2026, 7:10

हडपसर विषारी दारूकांडातील मुख्य सूत्रधार दत्ता लोंढेच्या आवळल्या मुसक्या ; उरुळी कांचन पोलीस अन् CID ची धडक कारवाई ; वेशांतर करून पळण्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या..

Wednesday, 26 August 2026, 23:11

मॉडिफाइड सायलेन्सर विरोधात शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई, 22 दुचाकीस्वारांकडून 22 हजारांचा दंड वसूल

Wednesday, 26 August 2026, 22:08

शिरूरमधील कुख्यात गुंड विशाल पंदीच्या टोळीवर ‘मोक्का’चा दणका; 11 जणांवर कारवाई

Wednesday, 26 August 2026, 21:41

नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात;महाराष्ट्र सरकारकडून तातडीच्या मदतीची तयारी

Wednesday, 26 August 2026, 21:30

पुण्यात आणखी एक महाकाय MIDC! चाकण-रांजणगावला टक्कर देणार 743 हेक्टरचं नवं इंडस्ट्रियल हब; ‘या’ भागात उभारणीला वेग

Wednesday, 26 August 2026, 20:37
Next Post

हडपसर विषारी दारूकांडातील मुख्य सूत्रधार दत्ता लोंढेच्या आवळल्या मुसक्या ; उरुळी कांचन पोलीस अन् CID ची धडक कारवाई ; वेशांतर करून पळण्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp