अनेकदा आपल्याला नवीन घरात जाताना काय काळजी घ्यावी, काय करावं हे समजत नसतं. पण अशा काही गोष्टी आहेत त्याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. एखाद्या वस्तूचा आकार, रचना किंवा इतर बाबी पसंत नसतील तर नव्या घरातील रचनेला त्या वस्तू शोभणाऱ्या नसतील तर त्या टाकून देणेच योग्य ठरते. यामध्ये फर्निचरपासून कपड्यांपर्यंत कुठलीही गोष्ट येऊ शकते.
पुस्तके असो किंवा क्रॉकरी वाहतुकीदरम्यान तुटू शकणाऱ्या नाजूक वस्तू बेडरूमशी संबंधित वस्तू या गोष्टी स्वतंत्र कराव्यात. कारण, अशा गोष्टी तुटण्याची जास्त शक्यता असते. जर कमी महत्त्वाची कागदपत्रे असतील तर त्याचे आत्ताचे महत्त्व पाहून त्याची विल्हेवाट लावावी. कारण, आपल्यापैकी अनेकजण असे असतील की अनावश्यक कागदपत्रेही ठेवतात. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.
तसेच जी मासिके अथवा पुस्तके वाचून झाली आहेत आणि जी पुन्हा वाचायची नाहीत, अशी पुस्तके मित्रांना किंवा वाचनालयाला दान करून टाकावीत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे कॉलेजची पुस्तके अथवा नोट्स अजूनपर्यंत सांभाळून ठेवल्या असतील, तर त्याही टाकून देण्याची वेळ आली आहे, हे लक्षात घ्यावे.
नव्या घरात जर नवा टिव्ही, नवी म्युझिक सिस्टिम घेणार असाल तर जुन्या वस्तू विकणेच उत्तम ठरू शकते. आपण जर वास्तूशास्त्रात विश्वास ठेवत असाल तर वास्तूनुसारच वस्तूंची मांडणी करावी.