Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पाणी का पाजता?” म्हणत मेंढपाळाला शिवीगाळ; दगडफेकीत दोन मेंढ्या जखमी, उरुळी देवाची येथील घटना

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 October 2026, 11:49

फुरसुंगी : मेंढ्यांना रस्त्यालगतच्या खड्ड्यातील पाणी पाजल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीने मेंढपाळाला शिवीगाळ करत दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उरुळी देवाची येथील आदर्शनगर परिसरात नुकतीच घडली आहे. या दगडफेकीत दोन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून, आणखी दोन मेंढ्यांना किरकोळ दुखापत झाली.

याप्रकरणी आण्णा लक्ष्मण मोटे (वय 50, सध्या रा. कचरा डेपो शेजारी, उरुळी देवाची; मूळ रा. मोडवे, ता. बारामती) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश झांबरे यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे हे आपल्या कुटुंबासह मेंढपाळीचा व्यवसाय करतात. तीन दिवसांपूर्वी सासवड येथून मेंढ्यांचा कळप घेऊन ते उरुळी देवाची येथील कचरा डेपो शेजारी मुक्कामासाठी आले होते.

मोटे हे आपली भावजय सोनाली मोटे, भाचा सुनिल कोकरे आणि पुतण्या धनंजय मोटे यांच्यासह आदर्शनगर परिसरातील टेकडीवर मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पाणी दिसल्याने मेंढ्या पाणी पीत असताना गणेश झांबरे तेथे आला. “माझ्या पाण्याच्या खड्ड्यात मेंढ्यांना पाणी का पाजता?” असा जाब विचारत झांबरे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत आहे. मोटे यांनी “ती मुकी जनावरे आहेत, त्यांना पाणी पिऊ दे,” असे सांगितले असता झांबरे यांनी मेंढ्यांना हुसकावण्यासाठी दगडफेक केली.

या दगडफेकीत एका मेंढीच्या जबड्याला दगड लागून जखम झाली, तर दुसऱ्या मेंढीच्या मांडीला मुक्कामार लागला. आणखी दोन मेंढ्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मोटे यांना हाताने मारहाण करण्यात आली. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या सोनाली मोटे यांनाही ढकलून दिल्याचा आरोप आहे.

 

आता या घटनेनंतर जखमी मेंढीवर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार करून तिला पुन्हा वाड्यावर आणण्यात आले. या घटनेप्रकरणी आण्णा मोटे यांनी गणेश झांबरे यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दिली असून, मेंढ्यांवर दगडफेक करून त्यांना जखमी केल्याच्या आरोपामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरमधील भयानक प्रकार! जन्मदात्या आई-बापानंच पोटच्या मुलाला संपवलं; दांडक्याने बेदम मारहाण, २ दिवस घरात विव्हळत ठेवलं नंतर बॉडीला…

Monday, 5 October 2026, 14:30

जेवणाच्या पैशांवरून मित्रांमध्ये वाद; डोक्यात दगड मारून तरुणाचा खून

Monday, 5 October 2026, 14:12

निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर सवाल; सर्वोच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

Monday, 5 October 2026, 14:05

बुलेटवरून नातेवाईकांकडे जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 12, 14 आणि 16 वर्षीय तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; अहिल्यानगर येथील घटना

Monday, 5 October 2026, 13:45

म्हाळुंगे येथे प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लूटले; तिघे ताब्यात

Monday, 5 October 2026, 13:36

मुळशीत एमडी ड्रग्जसह तरुणाला पकडले रंगेहाथ; 3 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Monday, 5 October 2026, 13:14
Next Post

पूर्ववैमनस्यातून तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न ; तिघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp