मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांचे उद्योग क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांची सिमेंट कंपनी अंबुजा सिमेंट्सचा व्यवसायही वाढवत आहे. असे असताना आता अदानी ग्रुपचे नाव आणखी एका कंपनीशी जोडले गेल्याची माहिती समोर आली आहे. हे दिसताच त्या कंपनीचे शेअर्स तब्बल 14 टक्क्यांनी वाढले आहेत.
स्टार सिमेंट असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी ईशान्येतील बाजारपेठेत आघाडीवर आहे. या कराराचे मूल्यांकन करण्यासाठी अदानी समूहाने अर्न्स्ट अँड यंग या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच स्टार सिमेंटचे शेअर 14 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. हा शेअर 5.86% वाढून 207 रुपयांवर बंद झाला. त्याचवेळी अंबुजा सिमेंटचे शेअर्स किंचित घसरणीसह 564.80 रुपयांवर बंद झाले.
अंबुजा सिमेंटचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत 9 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. अदानी समूह आपल्या सिमेंट व्यवसायाचा झपाट्याने विस्तार करत आहे. ज्या अंतर्गत स्टार सिमेंट्स खरेदी करणार असल्याचे दिसून आले. ही कंपनी ईशान्येकडील प्रमुख सिमेंट कंपनी आहे. त्याची स्थापित क्षमता 7.7 दशलक्ष टन प्रतिवर्ष असल्याचेही सांगण्यात आले.