माढा: सध्या देशाचा कारभार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हातामध्ये आहे. त्यावेळी सत्तेत येताना मोदींनी अनेक आश्वासने दिली. 2014 ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पहिल्या 50 दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन दिले होते. परंतु आजची परिस्थिती बघता मोदींनी एकही शब्द पाळलेला दिसत नाहीयेय, असे वक्तव्य शरद पवारांनी (Sharad Pawar) बुधवारी माढा लोकसभा मतदारसंघातील मोडनिंब येथील प्रचारसभेत बोलताना म्हणाले.
यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की,पंतप्रधान मोदी यांनी दिलेली किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत, याचा हिशेब मांडला. देशातील लोकांना महागाईच्या संकटातून मुक्त करणार, हे मोदींचे पहिले आश्वासन होते. पूर्वी वाहने खूप कमी प्रमाणात होती. पण आता वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. मोटारसायकल असो किंवा चारचाकी असो त्यासाठी पेट्रोलची गरजही लागते.
शरद पवार यांनी या प्रचारसभेत देशातील बेरोजगारीवरील मुद्द्यावर भाष्य केले. नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की, पेट्रोलचा दर 50 टक्क्यांनी खाली आणणार आहे. 2014 मध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 71 रुपये इतका होता. त्यामुळे हा दर 50 रुपयांपर्यंत खाली येईल, असे सामान्य नागरिकाला वाटले होते. पण आज त्यांची सत्ता येऊन 3650 दिवस झालेत आणि तरी सुद्धा पेट्रोलची प्रतिलीटर किंमत 106 रुपये इतकी आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात गेली. घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर लागतो. 2014 मध्ये गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये इतकी होती. आज हीच किंमत 1160 रुपयांवर पोहोचली आहे. मग या लोकांवर विश्वास ठेवायचा कसा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये म्हणाले होते की, देशातील सर्व बेकारी घालवू आणि सगळ्यांच्या हाताला काम देऊ. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ही संस्था जगभरातील रोजगाराचा अभ्यास करते. या संस्थेने भारतातील रोजगारांचा आढावा घेतला. या अहवालात देशातील 100 लोकांपैकी 87 जण नोकरीविना असल्याची माहिती समोर आलीय. मग मोदींनी कसली बेकारी घालवली? त्या आश्वासनाचं काय झाले? मोदींना दिलेला शब्द पाळता आलेला नाही. मात्र, आता तेच मोदी ठिकठिकाणी जाऊन काँग्रेसला शिव्या घालत आहेत, असे शरद पवार यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीचा हिशेब मांडला आहे.