पुणे : इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज आहेत? सत्तेतून बाहेर काढू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. मोदींकडे सांगण्यासारख काही नाही म्हणून ते टीका करतात, असाही शरद पवार म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या चोथ्या टप्प्याचे मतदानासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू, असा पलटवारही शरद पवार यांनी यावेळी केला.
काय म्हणाले शरद पवार ?
शरद पवार म्हणाले की, मोदींकडे सांगण्यासारख काही नाही म्हणून ते टीका करतात. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार मजबूत करा असे सांगितले. तर यांनी आमच्या पक्षात या असे सांगितले.त्यांच्या पक्षाच्या आसपास सुद्धा मी आणि उद्धव ठाकरे कदापि जाणार नाही, उलट आम्ही त्यांना सत्तेतून बाहेर काढू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
सत्तेचा गैरवापर करणे ही त्यांची खासियत आहे. लोकशाहीत दिलेलं मत त्यांना सहन होत नाही. अरविंद केजरीवाल यांची सुटका न्यायालयाने केली त्याचा मला आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले, पत्रकारांना तुरुंगात टाकायचं? गृहमंत्री यांना तुरुंगात टाकायचं? ही वाटचाल हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.
इंग्रजांना घालवण्यासाठी कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांना घालवले, तर मोदी काय चीज? अशी टीका शरद पवारांनी केली आहे. राहुल गांधी यांनी दौरा केला त्याचा अभिमान वाटला, तर मोदी त्यांना शहाजादे म्हणतात. त्यांच्या धोरणावर टीका करा, भाषणावर टीका करा, पण त्यांच्यावर वैयक्तिक टीका का करता? त्यांच्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले, इंदिरा गांधींनी देशासाठी योगदान दिले, असंही पवार यावेळी म्हणाले.