लोणी काळभोर : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सेवानिवृत्त मुख्यध्यापिका शकुंतला जयवंतराव जाधव (वय- ७५) यांचे रविवारी (ता. २८) अल्पशा आजाराने निधन झाले.
शकुंतला जाधव यांनी आळंदी म्हातोबाची आणि गलांडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षिका म्हणून कामकाज पाहिले होते. एक आदर्श शिक्षिका” म्हणून जाधव या परिसरात परिचित होत्या.
शकुंतला जाधव यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथील एका सहकारी बँकेच्या मुख्यालयातील शाखाधिकारी इंद्रसेन जाधव व विद्युत कंत्राटदार चंद्रसेन जाधव यांच्या त्या मातोश्री होत.