पुणे : शिक्षण क्षेत्रातील समानता, सुरक्षा, आणि सक्षमीकरणासाठी रायसोनी शिक्षण संस्थेची वचनबद्धता आहे. मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायक ठरेल. महाविद्यालयीन मुलींनी स्वतःचे संरक्षण स्वतः करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे तायक्वांदो व सेल्फ डिफेन्स, नॅशनल रेफ्री व नॅशनल व इंटरनॅशनल तायक्वांदो कोच सुरेश तुकाराम राठोड यांनी केले.
महाविद्यालयाच्या वतीने “निर्भय कन्या योजना (सेल्फ डिफेन्स)” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जी एच रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पुणेचे संचालक डॉ. एच. आर. कुलकर्णी, प्रवीण जांगडे उपस्थित होते.
नॅशनल रेफ्री व नॅशनल व इंटरनॅशनल तायक्वांदो खेळाडू सुरेश तुकाराम राठोड म्हणाले, की “आमचा उद्देश विद्यार्थिनींना सुरक्षित आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये देणे आहे. निर्भय कन्या योजना यांसारखे उपक्रम मुलींना निर्भय वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.”
डॉ. एच. आर. कुलकर्णी म्हणाले की, या उपक्रमाचा उद्देश मुलींना स्वसंरक्षण तंत्र शिकवून त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेला बळकट करणे हा होता. या कार्यक्रमात बीबीए, बीसीए, आणि बीसीएसच्या 107 हून अधिक विद्यार्थींनी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम मुलींच्या आत्मविश्वास आणि शारीरिक कौशल्यवृद्धीसाठी आयोजित करण्यात आला होता. यात मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध तंत्रज्ञान शिकवले गेले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढवला गेला.
या कार्यक्रमाचे समन्वयक विशाल एम. वाघोले होते. राठोड यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक ताकदीवर आधारित स्वसंरक्षणाचे विविध तंत्र शिकवले गेले. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्षश सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशन कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी या कार्यशाळेबाबत महाविद्यालयाचे कौतुक केले.