लोणी काळभोर : “ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार” या उदात्त ध्येयाने कार्यरत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘सहसचिव प्रशासन’ पदी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिताराम गवळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्यालयात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या निवडणूक प्रक्रियेत प्राचार्य सिताराम गवळी यांची सर्वानुमते संस्थेच्या ‘सहसचिव प्रशासन’ पदी निवड करण्यात आली आहे. ‘सहसचिव प्रशासन’ पदी निवड होताच, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभय कुमार साळुंखे व सचिव शुभांगी गावडे, कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी गवळी यांचे अभिनंदन करून भव्य सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य सिताराम गवळी यांनी विद्यार्थीप्रेमी शिक्षक, मुख्याध्यापक व आदर्श प्राचार्य म्हणून योग्य जबाबदाऱ्या पार पडल्या आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या अर्थविभागात सहसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
गवळी यांनी हि जबाबदारी उकृष्ठ सांभाळून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे आता गवळी यांना संस्थेच्या ‘सहसचिव प्रशासन’ पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, लोणी काळभोरच्या शैक्षणिक इतिहासात संस्थेच्या या उच्च पदापर्यंत जाणारी हि पहिलीच घटना आहे. प्राचार्य सिताराम गवळी सहसचिव प्रशासन पदी निवड होणे म्हणजे समस्त लोणी काळभोर ग्रामस्थांचा सन्मानच होय. या निवडीमुळे पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल ज्युनियर कॉलेज, टेक्निकल, इंग्लिश मीडियम, समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय आणि कन्या शाळा यामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.