श्रीगोंदा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित नाशिक-भगूर येथे झालेल्या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे खेळाडू पै. श्रुती येवले, पै. धनश्री फंड, पै. सिद्धी होळकर व पै. क्षीरसागर वैभव यांनी वजनगटामध्ये प्रेक्षणीय कुस्ती करत प्रथम क्रमाक मिळवला.
या सर्व विजयी खेळाडूंची पंजाब येथे होणा-या साउथ-वेस्ट झोन आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यापीठाच्या पुणे ग्रामीण, पुणे शहर व नाशिक या तीन विभागाच्या कुस्ती खेळाडूंना चीतपट करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाराजा कॉलेजच्या या खेळाडूंनी कुस्तीमध्ये नगर विभागाचा दबदबा निर्माण केला.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन माजी आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुलदादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, प्र. प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, सायन्स विभाग प्रमुख डॉ. नितीन थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, इंटरनॅशनल कुस्ती संकुलाचे प्रमुख मेजर हनुमंत फंड, अनिल होळकर आणि क्रीडा शिक्षक संतोष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.