लोणी काळभोर, (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील श्रीराम कुंजीरवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकपदी भाऊसाहेब गणपत कुंजीर, यांची तर दत्तात्रय लक्ष्मण कुंजीर, संभाजी गोरक्षनाथ आंबेकर यांची स्वीकृत सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ०७) हि निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.
यावेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच संतोष कुंजीर, सचिन तुपे, सुनीता धुमाळ, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप सुखराज धुमाळ, उपसरपंच चंद्रकांत मेमाणे, सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब धुमाळ, उपाध्यक्ष संदीप गोपीचंद धुमाळ सोसायटीचे सचिव विवेक ठोंबरे व सर्वसंचालक मंडळ उपस्थित होते.
दरम्यान, सहकार क्षेत्रातील विकास सोसायट्यांची मूहुर्तमेढ रोवताना १९४२ साली संस्थेची स्थापना कै. नारायण कुंजीर यांनी केली आहे. संस्थेकडून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपात कारभार चालू आहे.