पुणे : स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात एसएससीद्वारे २०२५-२६ मध्ये होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे वार्षिक कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार दिल्ली पोलिस परीक्षा २०२५ मध्ये कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पुरुष आणि महिलांसाठीचे अर्ज १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वीकारले जातील, तर नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये परीक्षा घेतली जाईल
एकत्रित ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन (सीजीएल) टियर १ परीक्षेसाठी २२ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सीजीएल परीक्षेसाठी अर्ज २१ मे २०२५ पर्यंत स्वीकारले जातील. जून-जुलैमध्ये परीक्षा घेतली जाईल. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा २०२५ मधील उपनिरीक्षकांसाठी १६ मे २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. तसेच, १४ जून २०२५ पासून अर्ज स्वीकारले जातील.
या पदांसाठी जुलै ऑगस्टमध्ये परीक्षा घेतली जाईल. संयुक्त उच्च माध्यमिक (१०+२) परीक्षेसाठी अधिसूचना २७ मे २०२५ रोजी जारी केली जाईल. यानंतर २५ जून २०२५ पर्यंत परीक्षेसाठी अर्ज स्वीकारले जातील. तसेच, जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा घेतली जाईल. संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा २०२५ साठी अधिसूचना २६ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केली जाईल. परीक्षेचे अर्ज १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्वीकारले जातील. तसेच, परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर २०२५ मध्ये घेतली जाईल, असे वेळापत्रकात नमूद केले आहे.