अजित जगताप
Satara News | वडूज : सध्या रमजानच्या उपावासाचे दिवस असून मुस्लिम बांधव रोजा साजरा करत आहे. त्यांनी इपत्यार पार्टीसाठी निमंत्रण देऊन आमचा सन्मान केला आहे. जात व धर्मापेक्षा माणुसकीचा संदेश देणाऱ्या या सणाला सर्वांचे कल्याण होईल. अशी सदिच्छा माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली.
रोजाचा आठवा दिवशी वडूज (ता. खटाव) येथे मुल्ला मज्जिद अहेल सुन्नत वल् जमाअत या संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आवर्जून प्रभाकर देशमुख यांनी चादर अर्पण केली. यावेळी बोलताना देशमुख यांनी वरील सदिच्छा व्यक्त केली यावेळी वडूज नगरीचे प्रा. बंडा गोडसे, पृथ्वीराज गोडसे, निलेश जाधव, अक्षय थोरवे, व अतुल पवार, मुन्ना मुल्ला, अजित जगताप तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजा या उपवासामुळे शरीरावर नियंत्रण…
यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचे महत्व पटवून दिले पाहिजे. शिक्षणामुळे विचारांची क्षमता वाढीला लागते. रोजा या उपवासामुळे शरीरावर नियंत्रण ठेवले जाते. रमजान बंधुत्वाचा व माणुसकीचा संदेश देणारा सण आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे दिनांक ६ एप्रिल रोजी वडूज नगरीमध्ये येत असून दुपारी चार वाजता ते या मशिदीला भेट देऊन मुस्लिम समाजाची चर्चा करतील. असे ही देशमुख यांनी सांगितले.
या इफ्तार पार्टी निमित्त मौलाना तहसील रजा, जावेद गणी मुल्ला, असलम मुल्ला, बंटी मुल्ला, अमला मुल्ला, शकीर मुल्ला, मन्सूर मुल्ला, दाऊद मुल्ला खान अमीन मुल्ला, लालू आतार, इसाक मुल्ला, इरफान मुल्ला, महंमद शरीफ आतार, जाफरभाई आतार, इम्तियाज बागवान, जावेद मुनेर, सज्जाद शेख, शिराज शिकलगार , नजीर पठाण, मन्सूर पिंजारी, बरकत मुल्ला, सादिक मुल्ला ,खलील मुल्ला, अरिफ मुल्ला दिलावर मुल्ला, सिकंदर मुल्ला, समीर शेख, समीर आतार, शकील मुल्ला व मुस्लिम बांधवांनी पार्टीचा आस्वाद घेतला.
दरम्यान, या वेळेला मुस्लिम कब्रस्तान संरक्षित भिंतीबाबत निधी देऊन ही भिंत पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली. सदरच्या धार्मिक कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम ऐक्यासोबतच माणुसकीची शिकवण देण्यात आली.
कोणताही राजकीय लवलेश नसलेल्या या कार्यक्रमात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याबाबत वडूज नगरीमध्ये सकारात्मक रित्या दोन्ही समाज कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्यास मदत करीत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Satara News : संविधान रक्षणासाठी लढणे आवश्यक ; शाहीर संभाजी भगत
Satara News : वडूज नगरीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारचा निषेध आंदोलन