लहू चव्हाण
(Satara News ) पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पाचगणी येथील शिक्षण संस्थेकडून कष्टकरी श्रमजीवी कामगारांना कमी वेतन देऊन सेवा अटी शर्तीचा भंग केला जातो. या गैरकृत्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुकारलेला १५ व १६ मार्च रोजीचा संप सातारा( Satara)औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्तीने तूर्तास मागे घेतला असल्याचे प्रसिद्धीस प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कायदेशीर संपाची नोटीस…!
पाचगणी महाबळेश्वर येथील कामगारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून लढा उभा केला आहे. त्याचा एक भाग म्हणून फिदाई अकॅडमी या शैक्षणिक संस्थेकडून शाळा वस्तीग्रह बंद करण्याच्या निर्णया विरोधात कामगारांना भरपाई व मागील थकबाकी मिळाली पाहिजे. पुणे व मुंबई येथील शैक्षणिक संस्थेत कामगारांना सेवेत समाविष्ट केले पाहिजे, अशा मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ भिसले यांच्याकडे संघाने कायदेशीर संपाची नोटीस दिली होती. संप पुकारल्यामुळे फिदाई अकॅडमीने औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
न्यायालयाने या संपाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व शिक्षण संस्था चालकांना मध्यस्थी करून तडजोडासाठी न्यायालयाने सूचना केली, त्यानुसार येथे शनिवारी (ता. १८) रोजी सातारा न्यायालयात उभय पक्षांमध्ये चर्चा आणि वाटाघाटी होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे तूर्तास संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाने केलेल्या सूचनेचे संघटनेने स्वागत केले आहे.
वैराट म्हणाले,”फिदाई अकॅडमी या शिक्षण संस्थेने भरपाई न दिल्यास पुन्हा संपाचा मार्ग अवलंबला जाईल. तूर्तास संप मागे घेण्यात आला आहे.” दलाच्या वतीने वकील संकेत मोरे यांनी युक्तिवाद केला. असेही सांगितले.
दलाचे तालुकाध्यक्ष नितीन वन्ने ,सरचिटणीस अभिजीत ननावरे आणि कार्याध्यक्ष सूर्यवंशी वायदंडे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे. या पत्रकावर यांच्या स्वाक्षरी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!