सुरेश घाडगे
परंडा : खासापूरी – करमाळा रोडवरील पालखी मार्गावरील संतसेना महाराज चौकात संतसेना महाराज नामफलकाचे अनावरण रविवार ( दि. १३ ) नाभीक संघटना व वारकरी सांप्रदाय यांच्या वतीने करण्यात आले .
वारकारी सांप्रदायातील महान संत व नाभीक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांनी समाजाला दिलेली शिकवण, उपदेश येणाऱ्या पिढीला व सर्वांनाच आठवणीत राहावे, या उद्देशाने संत एकनाथ महाराज पैठण यांच्या पालखी मार्गावरील या चौकास वारकरी संप्रदाय व नाभीक संघटनेच्या वतीने सन २००८ साली ” संत सेना महाराज चौक” असे नामकरण देण्यात आलेले आहे.
तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी संतसेना महाराज पुण्यतिथी व संत एकनाथ महाराज पालखी दिवशी या नामफलकाचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात येते.
या चौकाची ओळख “संत सेना महाराज चौक ” अशीच आहे. परंतू काही दिवसापूर्वी अज्ञाताने हा नामफलक पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे वारकरी संप्रदाय व नाभीक समाजाच्या भावना दुखावल्या. परंतु परंडा नाभीक संघटना व वारकरी संप्रदाया यांच्या वतीने या नामफलकाचे अनावरण केले व पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.
परत असा प्रकार झाल्यास नाभीक संघटना खपवून घेणार नाही. तालुका – जिल्हा व राज्य स्तरावर याची दखल घेतली जाईल. असा ठराव यावेळी झाला.
यावेळी नाभीक महामंडळाचे युवक जिल्हाध्यक्ष नागेश काशीद, संघटनेचे मार्गदर्शक किरण डाके, प्रकाश काशीद, नागेश यादव, विशाल काशीद, दिपक डाके, गणेश काशीद, युवक तालुकाध्यक्ष प्रितम डाके, आकाश काशीद, स्वप्नील जाधव, आण्णा लोकरे, बंडू डाके, विक्रम शिंदे, दत्ता डाके, कृष्णा काशीद, उदय काशीद, प्रभाकर वाघमारे, गणेश चौधरी, गणेश जमदाडे, अक्षय जमदाडे आदी उपस्थित होते.