Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony लोणी काळभोर, ता. 14 : अवघ्या महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आता काहीच दिवस शिल्लक असतानाच, लोणी काळभोर-कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळाची झालेली दयनीय अवस्था प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि बेजबाबदारपणाचा संतापजनक नमुना ठरत आहे. लाखो वारकऱ्यांच्या पवित्र मुक्कामस्थळावर आज अतिक्रमण आणि बांधकामातील राडारोड्याचे डोंगर उभे राहिले असून संबंधित विभाग मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony

पालखी तळावर सध्या सर्वत्र बांधकामातील अवशेष आणि मातीचे ढीग पडलेले आहेत. अनेक ठिकाणी बांधकामातून निघालेला राडारोडा थेट पालखी तळावर आणून टाकण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण मैदानाचे विद्रूपीकरण झाले आहे. Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony
लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालय या पालखी तळापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे तलाठी कार्यालय तर पालखी तळाच्या परिसरातच आहे. तरीदेखील एवढा मोठा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दररोज पालखी तळावर नवे अतिक्रमण उभे राहत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. लाखो भाविकांच्या श्रद्धास्थानाची अक्षरशः माती होत असताना महसूल विभाग, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याची तीव्र टीका होत आहे. Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony
‘कोणाच्या आशीर्वादाने’ टाकला जातोय राडारोडा?
पालखी तळावर मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यासाठी कोणाचे संरक्षण मिळत आहे? काही आर्थिक हितसंबंधांमुळे हा प्रकार सुरू आहे का? असा संशयही आता व्यक्त केला जात आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले अतिक्रमण आणि डंपिंग प्रशासनाच्या माहितीशिवाय होणे अशक्य आहे. अशी स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका जनतेला
पालखी तळावरील माती आणि राडारोडा हटवण्यासाठी आता शासनालाच लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बोजा पुन्हा एकदा जनतेच्या करातून भरावा लागणार आहे. वर्षभर पालखी तळाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनावर असतानाही प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीनेही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony







