राज्यातलं सरकार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील गांडू बगीचा; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणले … तुमची चड्डी
Pune Prime News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर भाष्य केलं होतं. त्यावर तुम्ही बोलणार का? आहे का तुमची एवढी हिंमत, आधी त्यावर बोला मग आमच्याकडे या, आमच्याकडचा सगळा कचरा तुमच्याकडे गेला आहे, तो आधी दूर करा. असं बोलताना राज्यातील सरकार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील गांडू बगीचा आहे, नामदेव ढसाळांचा कविता संग्रह होता गांडू बगिचा. हा गांडू बगिचा आपल्याला महाराष्ट्रात दिसत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले आमचा कचरा तुमच्या डंपिंगमध्ये घेतला आहे ना? तो आधी साफ करा, तुम्ही डुकरासारखं त्यात लोळत आहात, हा कचरा तुम्ही साफ करा असं म्हणत असताना, मी फक्त आशिष शेलारांना बोलत नाही. भाजपच्या सर्व नेत्यांना बोलतोय. असेही ते म्हणाले. संजय राऊतांना आशिष शेलार यांच्या टीकेबाबत विचारलं असता, कोण आशिष शेलार? असा सवाल त्यांनी केला. अजित पवार, हसन मुश्रीफ, राहुल शेवाळे, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्याविषयी का बोलत नाही? तुमची चड्डी सुटली आहे. लोंबत आहे. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
काय म्हणाले होते आशिष शेलार
आज बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचं नेतृत्त्व स्वीकारलं आहे. यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे. आदित्य ठाकरे यांचं कुटुंब सोनिया गांधी यांच्यासमोर झुकलं आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती.