महेश सूर्यवंशी
दौंड : दौंड तालुक्यातील हिंगणी बेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. ही निवडणूक आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भीमराव खैरे यांची सरपंचपदी निवड झाली.
या निवडणुकीचे अध्यक्ष मंडल अधिकारी दादा लोणकर व ग्रामसेविका शीतल कापरे होते. सरपंचपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत संभाजी खैरे यांना ११ पैकी ६ मते मिळाली, तर रेश्मा गायकवाड यांना ३ मते मिळाली. एक मत बाद झाले असून एक सदस्य अनुपस्थित होते.
या निवडणुकीप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती केशव ढवळे, श्री. संजय जाधव (सुमन नारायण ग्रामविकास प्रतिष्ठान), . अभिमन्यू गिरमकर (उपाध्यक्ष, किसान मोर्चा), . देवदास ढवळे (उपाध्यक्ष, किसान मोर्चा दौंड तालुका), चेअरमन दादासाहेब कतुरे, माजी सरपंच किसन गायकवाड, माजी उपसरपंच प्रकाशराव ढवळे, माजी चेअरमन भाऊसाहेब कामठे,. निखिल नामगुडे, बबलू काळे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच विकास ढवळे, बापू रणसिंग, बापू गायकवाड, दादासाहेब माने, एकनाथ पवार यांची उपस्थिती लाभली.
नवीन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमदार राहुल कुल यांचे व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने ही निवडणूक शांततेत पार पडली.