पुणे : शिवणेतील बागुल उद्यानालगतच्या ओढ्यात वाहून चाललेल्या व्यक्तीचे प्राण पुणे शहर पोलिसांनी वाचविल्याची घटना शुक्रवारी (ता.८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे यांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे हे शुक्रवारी (ता.८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, बागुल उद्यानाजवळील आंबील ओढा नाल्यात एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला असता, तरुण ओढ्यात आढळून आला.
पुणे पोलिसांनी वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण वाचविल्याचा थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
दत्तवाडी, पुणे पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे यांनी शिवणेतील बागुल उद्यानालगतच्या ओढ्यात वाहून जात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले. स्वतः जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेले शाैर्य ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रीद सार्थ ठरवणारे आहे. त्यांच्या कामगिरीला सलाम! pic.twitter.com/kDDVQl9Ykn
— Supriya Sule (@supriya_sule) July 9, 2022
पोलीस कर्मचारी पोकारे व शेख यांनी दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला ओढ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणाने त्यांना ढकलून पाण्यात उडी मारली. त्यानंतर तरुणाने पाण्यात उडी मारल्यानंतर पोलीस शेखनेही पाण्यात उडी मारली. आणि तरुणाला पाण्यातून बाहेर कडून प्राण वाचविले आहे.पोलिसांनी तरुणाच्या घरच्यांशी संपर्क साधला. व पोलिसांनी तरुणालाआईकडे सुपूर्त केले आहे.
दरम्यान, नागरिकांनी मोबाईलवरून ही घटना रेकॉर्ड केली. या व्हिडियोत हा आत्महत्येचा थरार बघायला मिळत आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ या ब्रीद वाक्याप्रमाणे पोलिसांनी स्वतः जीव धोक्यात घालून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचविला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे यांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. पुणे शहर पोलिसांच्या कार्याला ” PUNEPRIMENEWS”चा सलाम…!