बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यातील साकेत जगताप यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी त्यांना पत्र दिले आहे. तसेच सरचिटणीस पदी अजिंक्य टेकवडे, वैभव सोलनकर, स्वप्निल मोडक, अनिकेत ढमाले यांना सुद्धा नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
या निवडीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, गंगाराम जगदाळे, अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, पंडित मोडक, राहुल शेवाळे, निलेश जगताप, शेखर वढणे, वकील श्रीकांत तामहाणे, अमोल जगताप तसेच भारतीय जनता पक्षाच्या पुरंदर- हवेली मधून निवडीनंतर या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.