Sad News : ठाणे : बोकडाचा मृत्यू ही चर्चेची बातमी होऊ शकते का? होय, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात एका बोकडाचा मृत्यू हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण देखील तसेच आहे. शेरू नावाच्या या बोकडाच्या अंगावर उर्दूमध्ये ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असे नैसर्गिकरित्या लिहिले होते. त्यामुळेच या बोकडाची किंमत लाखांमध्ये नाही, तर तब्बल १ कोटी १२ लाख ७८६ रुपये एवढी ठेवण्यात आली होती.(Sad News)
तब्बल १ कोटी १२ लाख ७८६ रुपये एवढी ठेवण्यात आली होती.
यंदाच्या बकरी ईदच्या मुहूर्तावर बोकडाला चांगला भाव मिळून मालामाल होण्याचं स्वप्न मालक शकीलने पाहिलं होतं. ईदला तो बोकड विकून त्यापासून मालकाला पैसे मिळणार होते. (Sad News)या पैशातून मालक गावासाठी शाळा सुरू करणार होते. शिवाय रुग्णांना शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका खरेदी करणार होते. पण, आजार झाल्यामुळे या बोकडाचा मृत्यू झाला. त्यामुळे बोकड मालक शकील याचं ते स्वप्न अधुरंच राहीलं. बोकडाचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर कपडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शकीलला शेळ्या पाळण्याचाही छंद आहे. ते अनेक वर्षांपासून शेळ्या पाळत असून, बकरीदच्या मुहूर्तावर त्यांची विक्री करून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या देखरेखीतील एका शेळीने एक अतिशय सुंदर पिल्लू दिले. शकीलच्या मुलांनी त्याचे नाव शेरू ठेवले. ते कोकरू थोडं मोठं झाल्यावर त्यांचे लक्ष त्याच्या अंगावर बनलेल्या ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’च्या खुणांकडे गेले. हे पाहून शकीलला समजले की हा बकरा चांगल्या किमतीत विकला जाऊ शकतो.(Sad News)
शकील यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे शेरूचे संगोपन केलं. त्याला रोज सफरचंद, द्राक्षे, काजू-बदाम अशा गोष्टी खायला द्यायला सुरुवात केली. या आहाराचा परिणाम असा झाला की दोन वर्षांच्या शेरूचे वजन १०० किलोपर्यंत पोहोचले. मात्र, मधल्या काळात शेरूची प्रकृती खालावली. शकीलच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर खूप उपचार करण्यात आले. त्याला रोज दोन हजार रुपयांची औषधे दिली जात होती; पण ही औषधे कामी आली नाहीत. मग एके दिवशी अचानक त्याचा मृत्यू झाला. शेरूच्या जाण्याने शकीलच्या स्वप्नांचा चुराडा झाला.(Sad News)
याआधीही शकील यांच्याकडे एक मौल्यवान बोकड होता, ज्याची किंमत त्यांनी १२ लाख रुपये ठेवली होती. मात्र, त्यासाठी कोणीही खरेदीदार न मिळाल्याने शकील यांनी स्वत: बकरी ईदला कुर्बानी दिली. त्यामुळेच यावेळी शेरू कितीला विकला जातो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, बकरीईदपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याने शकील यांच्यासह आजूबाजूचे लोकही दु:खी झाले आहेत. बोकडाच्या मृत्यूने त्यांच्या सर्व आशा मावळल्या. शिवाय ज्यांनी या बोकडासाठी बोली लावली होती. तेही दुःखी झाले.(Sad News)