दौंड : दौंड शहरातील बंगलासाईड परिसरात ‘भैरवनाथ सांस्कृतिक व क्रीडा मंडळ’ संचलित मनोरंजन क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर रम्मी जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे . या कारवाईत तब्बल 36 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 लाख 92 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विनोद उर्फ जब्बार दत्तु जाधव, योगेष खंडु शेंडे (वय 33),कचरू मधुकर शेळके (वय 53) राजु दत्ताराम पवार (वय 58), सुशील पिटर हारगुडे (वय 36), आकाश आनंद लोडी (वय 31),प्रमोद चिमाजी सोनवणे (वय 44), योसेफ मेशक खांट (वय 50), हेमराजी कुमार कारू माजी (वय 28) अँन्ड्रीव सेबेस्टेन फिलीप (वय 34) फिलीप सायमन फ्रान्सीस (वय 57), सिराज मोहीदीन खान (वय 66), विकास कुमार मदन रावत (वय 32), प्रेम सुनिल नामदास (वय 25), उत्तम गोवींद सोनवणे (वय 61), विकासकुमार रविंद्र रावत, उपेंद्र द्वारका राजवंशी (वय 42), मार्कस बाबुराव गायकवाड (वय 49), चिरंजीव कुमार जयप्रकाश सिंग (वय 36) निरज विक्रम मांझी (वय 21), मुकेश कुमार बाबुलाल सिंग (वय 42) जेकब सुनिल जाधव (वय 26), सोमनाथ संभाजी लोढी (वय 45) प्रशांत रमेश जाधव (वय 34) विशाल गुलाब कोंडके (वय 31, वरील सर्व रा. दौंड), जगन्नाथ राम काळे (वय 44, केडगाव चैफुला ता. दौंड जि. पुणे), वैभव श्रीकांत शेलार (वय 30, रा. पाटस ता. दौंड जि. पुणे) सुनिल महादेव काळे (वय 46 रा. देऊळगावराजे ता. दौंड), दिगांबर लक्ष्मण वाघमोडे (वय 45 रा. सोनवडी ता. दौंड जि. पुणे), सुरज शरद थोरात (वय 30, रा. नानवीज ता. दौंड), निरंकार दादासाहेब पोटे (वय 27), युवराज संजय गायकवाड (वय 35 ), केतन रत्नदीप सोनवणे (वय 26 रा. आमराई बारामती ता. बारामती) जितेंद्र नागनाथ हजारे (वय 39 रा. उरळी कांचन ता. हवेली जि.पुणे), गणेश शंकर अहिवळे (वय 42 रा. काष्टी ता. श्रीगांदा जि. अहिल्यानगर) व संतोश श्रीरंग विटकर (वय 41, रा. जलालपुर ता. कर्जत जि. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार आसिफ दिलावर सय्यद यांनी सरकारतर्फे दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून झडती वॉरंट घेऊन विशेष पथकाने बुधवारी (५ ऑगस्ट) सायंकाळी बंगलासाईड येथील पत्र्याच्या शेडमधील मनोरंजन क्लबवर छापा टाकला.

याछाप्यात तीन वेगवेगळ्या टेबलांवर प्लास्टिकच्या काईनच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करत रम्मीचा जुगार खेळला जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी क्लबमधून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, विविध रंगांचे काईन, पत्त्यांचे कॅट, मोबाईल फोन, सीसीटीव्ही डीव्हीआर तसेच मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.
तपासादरम्यान क्लबमध्ये खेळणाऱ्या अनेकांकडे सभासद नोंदणी नसल्याचे आढळून आले. तसेच क्लबमध्ये परवान्याच्या अटींचे उल्लंघन करून आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.या कारवाईत क्लबचा मालक, व्यवस्थापक, जुगार खेळणारे तसेच जुगारास प्रोत्साहन देणारे अशा एकूण 36 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही धाड पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, अविनाश गायकवाड, संतोष कुलथे तसेच दौंड पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री करीत आहेत.







