Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 27 September 2026, 16:13

लोणी काळभोर : हॉस्पिटलमधील अनियमिततेवर कारवाई न करण्यासाठी तसेच हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू नये, यासाठी तब्बल 20 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (ता. 26) धानोरी, भैरवनगर येथील संबंधित हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.

डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय 50), क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी (वर्ग-2), नगर रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका, असे एसीबीच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉस्पिटलच्या कामकाजातील अनियमिततेबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाची चौकशी डॉ. चकोर यांच्याकडे होती. 18 सप्टेंबर रोजी ते तक्रारीच्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्रुटींचे निराकरण करावे लागेल, अन्यथा हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल, असे सांगून अहवाल न पाठविण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराकडून त्यावेळी 30 हजार रुपये स्वीकारण्यात आले, तर उर्वरित रकमेबाबत नंतर सांगतो, असे चकोर यांनी सांगितल्याची माहिती एसीबीने दिली. याबाबत तक्रारदाराने 21 सप्टेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शनिवारी धानोरी, भैरवनगर येथील हॉस्पिटलमध्ये सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराच्या केबिनमध्ये 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 मधील कलम 7 अन्वये विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. डॉ. चकोर यांना शनिवारी दुपारी दोन वाजता ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ व सतीश वाळके तसेच एसीबीच्या पथकाने केली.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30
Next Post

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp