Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 September 2026, 15:30

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि त्यांचे संस्थापक अभिजीत दीपके हे विशेष चर्चेत आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर यशस्वी आंदोलन केल्यानंतर, पक्षाने ‘स्कूल ठीक करो’ मोहीम राबवून सरकारी शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले. या संपूर्ण राजकीय हालचालींमागे आणि आंदोलनाच्या नियोजनामागे नेमका कोणाचा हात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पक्षाचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी यामागची महत्त्वाची माहिती उघड केली आहे. महाराष्ट्रातील अजिंक्य शिंदे हे अभिजीत दीपके यांचे मुख्य मार्गदर्शक असून ते संपूर्ण रणनीती आखत आहेत. या माहितीला दीपके यांनी एका व्हिडिओ कॉल दरम्यान दुजोरा दिला आहे.NEET पेपर फुटीच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनात शिंदेंचा वाटा अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांनी आंदोलकांची राहण्याची सोय, स्वयंसेवकांचे जाळे निर्माण करणे आणि गर्दीचे नियोजन अत्यंत कौशल्याने सांभाळले होते. सुरुवातीला काही मोजक्या सहकाऱ्यांपर्यंत मर्यादित असलेल्या या चळवळीचे रुपांतर देशभरातील स्वयंसेवकांच्या मोठ्या नेटवर्कमध्ये करण्यात शिंदे यांनी यश मिळवले.

अजिंक्य शिंदे हे पूर्वी आम आदमी पक्षाशी जोडलेले होते आणि दीपके यांच्याशी त्यांची जुनी ओळख आहे. पक्ष स्थापने आधीपासूनच ते दीपके यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या याच अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून ऑगस्ट 2026 मध्ये सीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांची ‘National Organisation In-Charge’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता निवडणूक आयोगाविरोधात होणाऱ्या नव्या आंदोलनाची आणि संघटनात्मक विस्ताराची संपूर्ण जबाबदारी पुन्हा एकदा अजिंक्य शिंदे यांच्यावरच असणार आहे.

आता पक्षाने आपली मोर्चाची दिशा थेट भारतीय निवडणूक आयोगाकडे वळवली आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा न दिल्यास दिल्लीत पुन्हा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दीपके यांनी दिला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10
Next Post

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp