Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 16:13

मुंबई : मुंबईचे प्रमुख ‘फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अत्यंत संवेदनशील संरक्षित क्षेत्रात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 28 ऑगस्ट रोजी उद्यानातील शासकीय कार्यालयाजवळील नदीपात्रात हा सोहळा पार पडल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकारामुळे वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अनेक दुर्मिळ वन्यजीवांचे अधिवासस्थान आहे. निसर्गाचे संरक्षण व्हावे आणि वन्यप्राण्यांना मानवी त्रासापासून वाचवता यावे, यासाठी सामान्य नागरिक किंवा पर्यटकांना येथील नदीपात्रात उतरण्यास प्रशासनाकडून सक्त बंदी घातली जाते. असे असताना, मग या विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाला कोणत्या नियमांच्या आधारे आणि कोणाच्या सहमतीने परवानगी दिली गेली? असा थेट सवाल आता स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.

संरक्षित वनक्षेत्रात अशा प्रकारे नियमांची पायमल्ली होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही उद्यानाच्या हद्दीत कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे वन्यजीव संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. “जर कायदे सर्वांसाठी एकच आहेत, तर अशा कार्यक्रमांना सवलत का दिली जाते?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जंगलाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या घटनेबाबत उद्यान प्रशासनाने त्वरित आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी अधिकारी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून त्याची माहिती जाहीर करावी, असा सूर आता उमटत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15

दौंडमध्ये चोरट्यांचा कारनामा! ‘यहाँ कोई संजय राऊत रहता है क्या?’ घराबाहेर झाडू मारणाऱ्या महिलेला विचारलं अन् क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार…

Sunday, 18 October 2026, 20:12

पुणेकरांनो सावधान! तुम्ही पिताय ते दूध खरोखरच शुद्ध आहे का? पुणे विभागात तब्बल ७८ टक्के भेसळयुक्त दूध जप्त

Sunday, 18 October 2026, 19:53
Next Post

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात 'डीलिंग' झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp