लोणी काळभोर , (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रुक्मिणी उर्फ जीजी ज्ञानोबा गुजर (वय-९१, गुजरवस्ती) यांचे आज शुक्रवारी (ता.७) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर कवडीपाट येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब गुजर यांच्या त्या मातोश्री होत.