(Pune Crime ) पुणे : गाडीच्या कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटने कागदपत्रे आरटीओ निरीक्षकाच्या अंगावर फेकून मारहाण केल्याची धक्कादायक घटना फुलेनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवारी (ता.१०) दुपारी १ ते ३ यादरम्यान घडली आहे.
निकी फ्रान्सीस स्वामीनाथन (वय ३८, रा. आदर्श इंदिरानगर, आळंदी रोड, फुलेनगर) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. याप्रकरणी मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित गायकवाड हे एक मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. तर आरोपी निकी स्वामीनाथन हा एक खाजगी एजंट आहे. फिर्यादी अभिजित गायकवाड हे फुलेनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात शासकीय कर्तव्य बजावीत असताना, आरोपी स्वामीनाथन हा त्यांच्या कार्यालयात आला.
दरम्यान, आरोपी स्वामीनाथन याने फिर्यादी गायकवाड यांच्या अंगावर गाडीचे पेपर फेकले. आणि ‘‘ए गायकवाड, हया पेपरवर सही करुन दे,’’ असे बोलून शिवीगाळ केली. तसेच ‘‘गायकवाड सही कर नाही तर मी तुला तुझ्या पत्त्यावर येऊन जीवे मारुन टाकील,’’अशी आरोपींने गायकवाड यांना धमकी दिली.
त्यानंतर आरोपीने गायकवाड यांची गंचाडी पकडून मारहाण केली. व अँटी करप्शनमध्ये अडकविण्याची धमकी दिली. तसेच गायकवाड यांच्या सहकार्यांना ‘‘आताचे आता रजिस्टरला नोंद कर, नाही तर मी तुला बघुन घेईल, ’अशी धमकी दिली.
याप्रकरणी गायकवाड यांनी आरोपी स्वामीनाथन याच्या येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने आरोपी स्वामीनाथन याला तातडीने अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात वडिलांनी केला १३ वर्षाच्या मुलीचा विनयभंग!
Pune Crime News : घरफोडी ! लोहगावमधील बंद बंगला फोडला ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास!