जालना : आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज जालना जिल्ह्यात पोहचली आहे. रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार यात्रेत सहभागी झाले होते. आज राजेंद्र पवार दिवसभर रोहित पवार यांच्या सोबत चालणार असून तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.
दिवाळी पाडव्यानंतर सुरू झालेल्या यात्रेने आतापर्यंत जवळपास अडीचशे किलोमीटरचा अंतर पार केला आहे. ही यात्रा येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला विधिमंडळावर जाऊन धडकणार आहे. राज्यातील वाढती बेरोजगारी राज्यात सुरू असलेले ड्रग्ज रॅकेट, वेळेत न होणारी पदभरती या विरोधात काढण्यात आली आहे. सगळ्या महाराष्ट्रात अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे.
राज्यात सध्या बेरोजगार हा प्रश्न खूप हलाखीचा बनलेला असून या विषयाला वाचा फोडण्यासाठी व तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी किंवा या हेतूने रोहित पवार यांनी हि संघर्ष यात्रा काढल्याची दिसून येत आहे. सरकारला जाग यावी व तरुणाचे प्रश्न सुटावेत, महाराष्ट्र बेरोजगार मुक्त व्हावा, यासाठी ही धडपड रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आहे