Rohit Pawar on Amol Mitkar : रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. तसेच, त्यांना कामधंदा उरलेला नाही. एकीकडे अजित पवार भाजपाबरोबर जाणं रोहित पवारांना चालत नाही. अशी टीका अमोल मिटकर यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे. ते नागपूर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले, अजित पवारांनी दिलेला निधी रोहित पवारांना चालतो. कर्जत-जामखेड मतदार संघाला ५४ कोटींचा निधी मिळाल्याबद्दल रोहित पवारांनी अजित पवारांचे आभार मानल्याचं पत्र मी ट्वीट केलं होतं, असं देखील अमोल मिटकरी म्हणाले.तसेच पुढे संघर्ष यात्रेवर बोलताना म्हणाले, रोहित पवारांनी कुठला संघर्ष केला आहे? कशासाठी यात्रा काढत आहेत?
रोहित पवारांच्या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन नाही. अन्यथा यात्रेत राष्ट्रवादीचे झेंडे दिसले असते. प्रसिद्धीपलीकडे यात्रेत काही असेल, असं मला वाटत नाही. रोहित पवारांना आयुष्यात कधीही संघर्ष करण्याची वेळ आल्याचं वाटत नाही. बालमित्र घेऊन यात्रा निघाली आहे. त्यामुळे यात्रेला कवडीचीही किंमत नाही, अशी टीका अमोल मिटकरांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पल फेकीचे कुणीही समर्थन करू शकत नाही. धनगर समाजाच्या मागण्या आहेत ते धनगर समाजाचे नेते महादेव जानकर, गणेश हाके यासारखे अनेक नेते आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यात पडळकरांवर झालेल्या घटनेचे कुणी समर्थन करणार नाही असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.