AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. सामन्यात दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या असून 313 धावा झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 172 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स गमावल्या. तर टीम इंडियाने दुसऱ्या डावात केवळ 4 धावांच्या आघाडीसह 141 रन्स करत 6 विकेट्स गमावल्या आहेत. या सामन्यात टीम इंडिया 145 धावांनी आघाडीवर आहे. त्यामुळे तिसर्या दिवशीही क्रिकेट चाहत्यांना आणखी रंगतदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात..
ऑस्ट्रेलियाने 9-1 धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली होती. मात्र भारताच्या गोलंदाजांनी कांगारुंना 181 धावांवर गारद केलं आणि 4 रन्सची लीड मिळवली होती. ऑस्ट्रेलियासाठी डेब्यूटंट ब्यू वेबस्टर याने सर्वाधिक 57 धावा केल्या आहेत. तर स्टीव्हन स्मिथने 33, सॅम कोनस्टासने 23, एलेक्स कॅरीने 21 आणि कॅप्टन पॅट कमिन्स याने 10 धावांचं योगदान दिलं आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या आहेत. तर नितीश रेड्डी आणि कॅप्टन जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 2-2 जणांना बाद केलं आहे.
दुसऱ्या डावात भारताची 145 धावांची आघाडी..
दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 4 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. टीम इंडियाने 32 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 141 धावा केल्या. या डावात टीम इंडियाने अशाप्रकारे 145 धावांची आघाडी घेतली आहे. भारतासाठी दुसऱ्या डावात ऋषभ पंतने ताबडतोब अर्धशतकी खेळी केली. ऋषभ पंतने 33 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह सर्वाधिक 61 धावांचा खेळी केली आहे.
या सामन्यात यशस्वी जयस्वालने 22 धावा केल्या. तर केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी प्रत्येकी 13-13 धावांचं योगदान दिलं. विराट कोहली याने 6 तर नितीश कुमार रेड्डीने 4 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा 8 आणि वॉशिंग्टन सुंदर 6 धावा करून नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियासाठी स्कॉट बोलँड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्स आणि ब्यू वेबस्टर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.