Revanth Reddy CM : काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर भट्टी विक्रमार्क यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Congress Leader Revanth Reddy)
या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही उपस्थित लावली.(Revanth Reddy CM )
रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत. सुमारे दशकभरापूर्वी तेलंगणा नवीन राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विरोधी पक्षाचा दणदणीत पराभव केला.(KCR)
119 सदस्यीय विधानसभेत पक्षाला 64 जागा मिळाल्या, तर बीआरएसला 39 जागांवर समाधान मानावे लागले. 2013 मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. आतापर्यंत केवळ चंद्रशेखर राव दोनदा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, यावेळी त्याना हॅट्ट्रिक करण्यात अपयश आलं. रेवंत रेड्डींनी चंद्रशेखर रावांचं स्वप्न धुळीला मिळवलं आणि काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली. (Telangana Assembly Elections 2023)
‘या’ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
दामोदर राजनरसिम्हा
उत्तम कुमार रेड्डी
भट्टी विक्रमार्क
कोमाटी रेड्डी
वेंकट रेड्डी
सीताक्का
पोन्नम प्रभाकर
श्रीधर बाबू
तुम्मला नागेश्वर राव
कोंडा सुरेखा
जुपल्ली कृष्णा पोंगुलेटी