पुणे : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरू संत श्रीतुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबतचा शासकीय ठराव मंजूर करण्यात आला आहे. पुढील आवश्यक कारवाईसाठी आणि विमानतळाचे नाव बदलण्यासाठी हा ठराव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे देखील विधानसभेत स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याची मागणी करणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेने गुरुवारी एकमताने मंजूर केला. सध्या या सुविधेला लोहगाव विमानतळ असे संबोधले जाते. पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवला जाईल. दरम्यान, पुण्याचे खासदार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नामकरणासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
पुण्याचे खासदार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे कि, पाठपुराव्याला यश; पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी आणखी एक पाऊल ! ‘जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ या नावासाठीचा पुनर्नामकरण प्रस्ताव महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर करण्यात आला असून याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार आणि मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद !
पाठपुराव्याला यश; पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी आणखी एक पाऊल !
‘जगद़्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ या नावासाठीचा पुनर्नामकरण प्रस्ताव महाराष्ट्र विधीमंडळात मंजूर करण्यात आला असून याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री… pic.twitter.com/rOlLikAKUD
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 20, 2024
Maharashtra Assembly passed a resolution on 19th December to rename Pune’s Lohegaon airport as “Jagadguru Sant Tukaram Maharaj Airport”. This resolution will be sent to Central Government for necessary action and rename the airport.
The resolution was proposed by Deputy Chief…
— ANI (@ANI) December 20, 2024